Jump to content

सामोसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समोशांसह हिरवी चटणी

समोसे
रायपूर,छत्तीसगढ येथील समोसे, चटणीसह

समोसा (मराठीत समोसा) हा बटाटा, मटार, कांदामैदा यांपासून बनवतात. याचे मूळ उत्तर प्रदेशात आहे.[ संदर्भ हवा ]

इतिहास

[संपादन]

इराणमध्ये समोशाला सम्सा किंवा सेनबोगास असे म्हणले जाते. तेथून तो दिल्लीत मुघलांचे राज्य असताना भारतात आला आणि सगळ्यांच्या चवीत बसला. आज भारताच्या प्रत्येक प्रातांत समोसा हा प्रकार मिळतो. साधरणपणे तेराव्या शतकात इराणमधल्या आचाऱ्यांनी तो तयार केला असावा. इ. स. १३०० च्या सुमारास कवी आमीर खुसरो यांनी समोसा या खाद्यपदार्थाचा उल्लेख केलेला आढळतो. इराणमधले इतिहासकार अबुल फजल बेहकीने दहाव्या शतकातल्या आपल्या पुस्तकात समोसा या खाद्यपदार्थाचा उल्लेख केला आहे. यावरून समोसा हा प्रकार फार जुना असला पाहिजे. सन १४९५मध्ये भारतात खाद्यपदार्थांचे एक हस्तलिखित लिहिले गेले. यात समोशाची रेसिपी देण्यात आली आहे. यात समोशाचे एक चित्रही आहे.अरबी कवी इशाक इब्न इब्राहिम यांनही आपल्या कवितांमधून सेनबोसागचे वर्णन केले आहे. सेनबोसागच्या चवीची वर्णने अनेक ठिकाणी आढळतात. इब्न बतूतानेही समोशाचा उल्लेख केला आहे. कझाकिस्तान या देशातही समोसा हा खाद्यप्रकार प्रसिद्ध आहे. येथे याला सोम्सा असं म्हणतात. कझाकिस्तानमधल्या समोशात भोपाळा आणि मांस घातले जाते. आफ्रिकेतल्या देशांमध्ये या पदार्थाला संबोसा असे म्हणले जाते आणि सणासमारंभाला तो तयार केला जातो.

कृती

[संपादन]

समोस्यासाठी लागणारी सामग्री: आवरणासाठी मैदा – 100 ग्राम जीर – ½ चमचा तेल – 1 चमचा मीठ – स्वादानुसार कांदा – 1 (बारीक चिरलेला) हिरव्या मिरच्या – 2-3 (बारीक चिरलेल्या) आल्याची पेस्ट – 1 चमचा कोथिंबीर – गरजेनुसार बटाटे – 4-5 (उकडलेले) हळद पावडर – ½ चमचा धणेपूड – 1 चमचा जिरे पावडर – 1 चमचा तेल – आवश्यकतानुसार

समोसा बनविण्याचा विधी: सर्वप्रथम मैदा, मीठ व थोडे तेल घेऊन एका भांड्यात चांगले मिसळून थोड पाणी घाला व त्याची कडक कणिक बनवा त्यात थोडा बेकिंग सोडा घाला व त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. मिश्रण बनविण्याची विधी: बटाट्याची साल काढून त्याला चांगले बारीक करून घ्या. कढईत तेल घेऊन त्यात कांदा, जीर, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरच्या चांगल्या एकत्र होऊ द्या व त्यात कुस्करलेले बटाटे घाला. 2-3 मिनिटे होवू द्या. त्यात हळद, जिरे पावडर, मीठ घालून शिजू द्या. नंतर 5 मिनिटांनी मिश्रण काढून घ्या. थंड होऊ द्या. मैद्याच्या पिठाची पुरी लाटून त्यात बटाट्याचे मिश्रण भरावे व समोस्याचा आकार देऊन तयार करावे. कढईत तेल घेऊन त्यात हळूहळू समोसे टाका. तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा व गरमागरम खायला द्या.